सोयाबीन आयातीचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ रद्द करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:09 AM2021-08-27T04:09:03+5:302021-08-27T04:09:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशात आणि राज्यात यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल, असा अंदाज असतानाच केंद्र सरकारने ...

The decision to import soybeans should be immediately revoked by the Central Government | सोयाबीन आयातीचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ रद्द करावा

सोयाबीन आयातीचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ रद्द करावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात आणि राज्यात यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल, असा अंदाज असतानाच केंद्र सरकारने परदेशातील जनुकीय बदल केलेल्या जीएम सोयाकेकच्या आयातीस परवानगी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे देशातील सोयाबीनचे दर कोसळत आहेत. त्यामुळे जीएम सोयाकेकच्या आयातीचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ रद्द करावा, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जीएम सोयाकेक आयातीच्या निर्णयाचा मोठा फटका देशातील सोयाबीनच्या दरावर होणार आहे. त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहे. एकीकडे जनुकीय बदल केलेल्या सोयाबीनच्या उत्पादनास केंद्र सरकारने भारतात अद्याप परवानगी दिलेली नाही. परदेशातील जीएम सोयाकेकच्या आयातीस परवानगी दिली आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे. त्याचा पुनर्विचार करून हा निर्णय तत्काळ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

भारतात आणि महाराष्ट्रातही सोयाबीनचे मोठे क्षेत्र आहे. महाराष्ट्र हे सोयाबीनचे उत्पादन घेणारे देशातील सर्वात मोठे राज्य असून ४५ लक्ष हेक्टर उत्पादन राज्यात होते. मराठवाडा, विदर्भ, प. महाराष्ट्रातसुद्धा हे पीक आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगले दर मिळाल्याने सोयाबीनचे क्षेत्र महाराष्ट्रात वाढले आहे. यावर्षी सोयाबीनचे चांगले उत्पादन होईल, असा अंदाज असतानाच केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागांतर्गतच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने १२ लाख टन जनुकीय बदल केलेल्या जीएम-सोयाकेक आयातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात नवीन सोयाबीन येण्यास सुरुवात झाली असतानाच नेमक्या याच वेळी हा आयातीचा निर्णय झाला. या निर्णयानंतर लागलीच सोयाबीनचे भाव सुमारे २ हजार रुपयांनी खाली आल्याने कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: The decision to import soybeans should be immediately revoked by the Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.