Join us

मनोरा आमदार निवास १ फेब्रुवारीपासून रिकामे, पुनर्बांधणी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 1:07 AM

मंत्रालयासमोरील मनोरा आमदार निवास येथे नवीन आमदार निवासाची इमारत बांधण्यासाठी सध्याची इमारत पाडण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १ फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवासातील कक्ष रिकामे करण्याचा आणि तेथील वीज, पाणीपुरवठा खंडित निर्णय मंगळवारी झालेल्या मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : मंत्रालयासमोरील मनोरा आमदार निवास येथे नवीन आमदार निवासाची इमारत बांधण्यासाठी सध्याची इमारत पाडण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १ फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवासातील कक्ष रिकामे करण्याचा आणि तेथील वीज, पाणीपुरवठा खंडित निर्णय मंगळवारी झालेल्या मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.समिती प्रमुख व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, मुख्य सचिव सुमित मलिक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कापोर्रेशन (एनबीसीसी) करणार आहे. पुनर्बांधणीसाठी पर्यावरण विषयक व इतर विविध परवान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एनबीसीसीला सहकार्य करावे व लवकरात लवकर परवाने मिळवून द्यावेत, असे यावेळी समितीच्या वतीने निर्देश देण्यात आले. तसेच बांधकाम लवकर सुरू करण्यासाठी १ फेब्रुवारीपासून आमदार निवासातील कक्ष रिकामे करावेत व तेथील वीज, पाणी पुरवठा खंडित करण्याचे निर्देशही देण्यात आले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचे काम कमी कालावधीत व्हावे, यासाठी वेगाने प्रक्रिया कराव्यात. तसेच या बांधकामासाठी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.

टॅग्स :मुंबई