मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:16 AM2017-08-12T04:16:03+5:302017-08-12T04:16:03+5:30
मुंबई शहर व उपनगरांमधील सुमारे ३५ हजार भाड्याने दिलेल्या व जुन्या इमारतींचा पुनर्विकास व दुरुस्तीचा मार्ग पुढील तीन महिन्यांमध्ये मोकळा होईल, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या लक्षवेधीवर दिले.
मुंबई : मुंबई शहर व उपनगरांमधील सुमारे ३५ हजार भाड्याने दिलेल्या व जुन्या इमारतींचा पुनर्विकास व दुरुस्तीचा मार्ग पुढील तीन महिन्यांमध्ये मोकळा होईल, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या लक्षवेधीवर दिले.
इमारतींमध्ये राहणाºया सुमारे ३० लाख भाडेकरूंच्या अधिकारांविषयी सरकार चिंतित आहे आणि जुन्या इमारतींच्या विषयासंदर्भात सरकारचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. या संदर्भात एका समितीची स्थापना पुढील महिन्यात केली जाईल व तीन महिन्यांच्या आत बीडीडी चाळीप्रमाणे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात सरकारी आदेश काढला जाईल, असे वायकर यांनी सांगितले.
मुंबईमध्ये सुमारे २० हजार इमारती अतिशय जुन्या व जर्जर स्थितीमध्ये आहेत. तशाच स्थितीतील सुमारे १४ हजार इमारती उपनगरांमध्येही आहेत. त्यात ३० लाखांपेक्षा जास्त लोक कठीण अवस्थेत राहत आहेत. त्यांना स्वामित्व अधिकारही मिळत नाही, असे लोढा यांनी सांगितले. आमदार राज पुरोहित, आशिष शेलार व अतुल भातखळकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.