Join us

एसआरएतील ‘त्या’ निर्णयामुळे भ्रष्टाचार बोकाळेल - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 5:19 AM

या निर्णयाने भ्रष्टाचार बोकाळे असे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) सदनिकांचे आकारमान २६९ चौरस फुटावरून ३०० चौरस फुट करताना संबंधित प्रकरणांवर निर्णय घेण्यासाठी कायदेशीर चौकट मोडून स्वतंत्र कक्ष गठीत करण्याचा बेकायदेशीर निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, या निर्णयाने भ्रष्टाचार बोकाळे असे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.सदनिकांचे आकारमान २६९ चौरस फुटावरून ३०० चौरस फुट करताना हा निर्णय सर्वस्वी झोपुप्राच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरच होणे आवश्यक आहे. असे असताना अशा संबंधित प्रकरणांवर निर्णय घेण्यासाठी कायदेशीर चौकट मोडून स्वतंत्र कक्ष गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. नंतर आणखी एक आदेश जारी केला आणि त्यात डीसीआरनुसार, परवानगी, आवश्यक त्या शिथिलता, वाढीव चटई क्षेत्रासहित सुधारित आशयपत्र, आराखडे मंजूर करण्याचे अधिकारसुद्धा या कक्षाला दिले. असा स्वतंत्र कक्ष गठीत करणे, हे विधानमंडळाच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे, यातून न्यायालयाचा अवमान सुद्धा होतो आहे. यातून गैरप्रकारांनाच मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस