सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आशा कर्मचा-यांमार्फत पोषण आहार पुरवठा करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:44 AM2017-09-21T04:44:00+5:302017-09-21T04:44:02+5:30
राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपामुळे बालके, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या पोषण आहाराचा पुरवठा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आशा कर्मचा-यांमार्फत पोषण आहार पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपामुळे बालके, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या पोषण आहाराचा पुरवठा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आशा कर्मचा-यांमार्फत पोषण आहार पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी अंगणवाडी सेविकेस असलेले दैनिक मानधन त्या कालावधीपुरते आशा कर्मचा-यांना देण्यात येणार असूनतसा जीआर आज काढण्यात आला. हा शासन निर्णय सध्याच्या संप कालावधीपुरता मर्यादित नसून तो पुढील कालावधीतही अडचणीची परिस्थिती उद्भवल्यास लागू असणार आहे.
संप करुन कुपोषीत बालके, गरोदर महिला, स्तनदा मातांना वेठीस धरण्याची अंगणवाडी कर्मचाºयांची कृती योग्य नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाºयांकडून तातडीने अंगणवाड्यांचा ताबा घेण्यात यावा व आशा कर्मचा-यांमार्फत उद्यापासूनच पोषण आहार पुरवठा सुरु करण्यात यावा, असे आदेश महिला-बालविकास सचिव विनिता वेद-सिंगल व एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे (आयसीडीएस) आयुक्त कमलाकर फंड यांनी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकाºयांना दिले आहेत.
अंगणवाडी सेविकांनी संप मागे घेण्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा केले आहे. आपल्या मागण्यांसाठी या सेविकांनी माता, बालकांचे प्राण धोक्यात घालणे योग्य नाही,असे त्यांनी म्हटले आहे.