मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर. पाटील यांच्या सांगली जिल्ह्यासाठी भेट दिली आहे. सांगली आणि यवतमाळ जिल्ह्यात अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच सांगली जिल्ह्यातील मौजे पेठ (वळवा तालुका) येथे अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुंबई मेट्रो, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, आणि महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार सांगली आणि यवतमाळ जिल्ह्यात अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 102 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल. तर या महाविद्यालयासाठी 130 पदे प्रस्तावित असून या महाविद्यालयाची विद्यार्थी क्षमता प्रतिवर्षी 40 विद्यार्थी असणार आहे.
तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक उपाय करण्यात आले आहेत. त्यानुसार, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ते देण्यात येणार आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना