माहीमच्या किल्ल्यातील झोपडीवासीय नव्या घरात, २२२ रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 12:58 PM2022-06-17T12:58:37+5:302022-06-17T12:58:53+5:30

माहीमच्या ऐतिहासिक किल्ल्यात शेकडो झोपडीधारक राहतात. समुद्राच्या लाटा अंगावर झेलत डौलाने उभ्या असणाऱ्या या माहीम किल्ल्याचे संवर्धन करण्यात येणार आहे.

Decision to rehabilitate 222 slum dwellers in Mahim Fort | माहीमच्या किल्ल्यातील झोपडीवासीय नव्या घरात, २२२ रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय

माहीमच्या किल्ल्यातील झोपडीवासीय नव्या घरात, २२२ रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय

Next

मुंबई :

माहीमच्या ऐतिहासिक किल्ल्यात शेकडो झोपडीधारक राहतात. समुद्राच्या लाटा अंगावर झेलत डौलाने उभ्या असणाऱ्या या माहीम किल्ल्याचे संवर्धन करण्यात येणार आहे. किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, देश-विदेशातील पर्यटकांसाठी हा किल्ला आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे या किल्ल्यावरील झोपडीधारकांचे काय, असा प्रश्न नक्कीच रहिवाशांना पडला. मात्र, त्यांनी आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण, लवकरच माहीमच्या किल्ल्यातील २२२ झोपडीधारक नव्या घरात जाणार आहेत. म्हणजेच त्यांचे लवकरच पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 
१९९७०-७२ पासून या किल्ल्यावर शेकडो झोपडीधारक वास्तव्य करून आहेत. अनेकांची मुले येथेच मोठी झाली. आता त्यांच्या पुढचे भवितव्य उज्ज्वल व्हावे यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. किल्ल्यावरील रहिवाशांचे  पुनर्वसन करण्याचे आदेश पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. किल्ल्यावरील संरचनेची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे.

३१४ सदनिकांना नोटिसा
३१४ किल्ल्यावर असणाऱ्या सदनिकांना नोटीस जारी करण्यात आल्या असून, त्यातील २२२ झोपड्या पात्र आहेत . दरम्यान, नोटीस जारी केल्यानंतर झोपडीधारकांनी छाननीसाठी कागदपत्रे सादर केली आहेत आणि त्यांची  छाननी सुरु असल्याची माहिती आहे.

- माहीम किल्ल्यावरील झोपड्या झोपडपट्टीधारकांनी रिकाम्या केल्यानंतर किल्ल्यावरील झोपड्या पाडण्यास सुरुवात होईल. संपूर्ण प्रक्रियेचा माहितीपट तयार करण्यासाठी खाकी टूर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर माहीम किल्ल्याच्या जीर्णोद्धाराची योजना व प्रस्ताव हा किल्ला रिकामा केल्यावरच महापालिकेच्या वतीने पुरातत्त्व सल्लागार नेमून केले जातील. 

- प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी, केंद्रीय पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथॉरिटी आणि इतर संबंधित प्राधिकरणांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यात येतील.

बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा
या किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या, किल्ल्यावर सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच पर्यटकांसाठी हा किल्ला आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरावा यासाठी नेमके कोणत्या उपाययोजना हाती घ्यायच्या, अशा अनेक विषयांवर गुरुवारी चर्चा करण्यात आली. या विषयांच्या अनुषंगाने मंत्रालयातील दालनात पुरातत्त्व विभाग, पर्यटन विभाग आणि मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माहीम किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करून १९७०-७२ पासून किल्ल्यावरील वास्तव्यास असणाऱ्या राहिवाश्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश देण्यात आले. 

Web Title: Decision to rehabilitate 222 slum dwellers in Mahim Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.