Join us

युतीचा निर्णय उद्या

By admin | Published: January 15, 2017 9:34 AM

महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन चार दिवस उलटले तरीही सेना-भाजपाच्या युतीवर अजुन शिक्कामोर्तब झाले नाही.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन चार दिवस उलटले तरीही सेना-भाजपाच्या युतीवर अजुन शिक्कामोर्तब झाले नाही. संक्रात आडवी आल्यामुळे युतीवर होणारी चर्चा 15 तारखेला होणार असल्याचे वृत्त होते. मात्र सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना-भाजपा पक्षाच्या नेत्यांनी युतीच्या पहिल्या बैठकीचा मुहूर्त सोमवारी (उद्या) साधला आहे.
 
या बैठकीला शिवसेनेकडून अनिल परब आणि अऩिल देसाई उपस्थित राहणार आहेत. तर भाजपाकडून आशिष शेलार आणि विनोद तावडे हजर राहणार आहेत. युतीचा निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षाकडून या चार नेत्यांची निवड करण्यात आली आहे. 
 
दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार,  मुंबई महापालिका निवडणुकीत युतीमध्ये १०६ जागांची मागणी भारतीय जनता पार्टीने शिवसेनेकडे केली असून, शिवसेना मात्र ७५पेक्षा एकही जागा जास्त द्यायला तयार नाही. त्यामुळे सध्या तरी युती होणे किचकट दिसत आहे.