Join us

विद्यापीठाच्या परीक्षाचा निर्णय आता लॉकडाऊन उठल्यानंतरच ...! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 8:17 PM

३ मे नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थितीनुसार परीक्षेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल.

 

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाने  दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीस्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व  प्रात्यक्षिक परीक्षा  ३ मे पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. ३ मे नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थितीनुसार परीक्षेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १५ एप्रिल २०२० च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील टाळेबंदीचा (लॉकडाऊन) कालावधी ३ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीस्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व  प्रात्यक्षिक परीक्षा  ३ मे २०२० पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेसंदर्भात  ३ मे नंतर शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल  असे सांगण्यात आले आहे परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखाही लांबणीवर : २०२० च्या उन्हाळी सत्राच्या मे व जून मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या असून त्याचे स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करण्यात येईल.

-------------------------------कोरोना-१९ मुळे टाळेबंदीचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर युजीसी, राज्य शासन व विद्यापीठ परीक्षेसंदर्भात गांभीर्यपूवक विचार करीत आहे. अनेकांनी याबाबत सूचना केलेल्या आहेत, यासंदर्भात लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी पॅनिक न होता, या कालावधीत त्यांनी घरात बसून युट्युब व ऑनलाईनच्या  माध्यमातून अभ्यास करावा, अभ्यासाच्या  काही समस्या असतील  तर आपल्या शिक्षकांना समाजमाध्यमाच्या माध्यमातून संपर्क साधून त्या सोडवाव्यात.- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

टॅग्स :परीक्षामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस