Join us

शाळांना सुट्टी जाहीर करा, शिक्षक संघटनेची मागणी

By रेश्मा शिवडेकर | Published: April 16, 2024 9:31 PM

याबाबत शालेय शिक्षण विभागाला पत्र लिहिले आहे.

मुंबई : उन्हाचा तडाखा वाढल्याने गेल्या वर्षी शाळांना २० एप्रिलपासून सुट्टी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर थेट १५ जूनला शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. यंदाही तशी मागणी होत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट पसरल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुट्टीची मागणी केली आहे.

याही वर्षी प्रचंड उष्माघातामुळे अनेक मुले तापाच्या साथीने हैराण आहेत. शिक्षक सुद्धा आजारी पडल्याचे कळते आहे. त्यामुळे शिक्षकांना निकालाची सर्व कामे घरूनच करण्याची सवलत द्यावी आणि विद्यार्थ्यांसाठी बुधवारपासून सुट्टी घोषित करावी, अशी मागणी परिषदेचे मुंबई विभाग कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे. दराडे यांनी याबाबत शालेय शिक्षण विभागाला पत्र लिहिले आहे.

टॅग्स :शिक्षक