ईडीची न्यायालयात याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इक्बाल मिर्चीची पत्नी व दोन मुले यांना फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात केला आहे.
इक्बाल मिर्चीची पत्नी हाजरा मेनन आणि मुले जुनैद मेनन, आसिफ मेनन यांना फरार आर्थिक कायद्यांतर्गत फरार घोषित करावे, अशी विनंती करणारा अर्ज ईडीने न्यायालयात सादर केला. सुरुवातीला ईडीने मिर्चीच्या भारतातील १५ मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली होती. तसेच सहा बँक खात्यांतील १.९ कोटी रुपये जप्त करण्याबरोबरच फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगीही मागितली.
या प्रकरणी ईडीने आतापर्यंत भारतातून व परदेशातून मिर्चीची ७९८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.