Join us

राज्यात २४९ अपघातप्रवण क्षेत्राची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या अपघातांना लगाम लावण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्र शोधण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या अपघातांना लगाम लावण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्र शोधण्यात आली असून, राज्यात अपघातप्रवण क्षेत्र होती त्यावर उपायोजना करण्यात येत आहे. त्यामध्ये घट झाली आहे अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

दारू पिऊन किंवा बेदरकारपणे वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे ही प्रमुख कारणे अपघातांमागे असली तरी रस्त्यांची दुरवस्था, धोकादायक वळणे, संरक्षक भिंत किंवा कठडे नसणे, गतिरोधक नसणे हे घटकही तेवढेच कारणीभूत ठरत आहेत. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी फक्त वेळकाढूपणाच सरकारकडून केला जात आहे. ५०० मीटर क्षेत्रामध्ये सलग तीन वर्षांत एकूण पाच प्राणांतिक अपघात किंवा गंभीर अपघात अथवा एक किंवा त्यापेक्षा जास्त अपघात झाले असतील अशा अपघात प्रवण क्षेत्रांची (ब्लॅक स्पॉट) माहिती गोळा केली जाते.

याबाबत परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात १३२४ अपघात प्रवणक्षेत्र होती. त्यामध्ये आता २४९ ची घट झाली असून, सध्या १०७५ अपघात प्रवण क्षेत्र राहिली आहेत. अपघात प्रवण क्षेत्रावर अपघात होण्याची कारणे शोधली जातात. त्यामध्ये रस्त्यावर पट्टे आहेत का, इतर कोणती कमरता आहे, पादचाऱ्यांचे अपघात होत आहेत की भरधाव वेगामुळे. रस्त्याची रचना वाहनचालक, पादचारीपूरक आहेत का हे पहिले जाते. त्या अनुषंगाने कारवाई केली जाते. अपघात टाळण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्रावर उपाययोजना सुरू आहेत. अपघात प्रवण क्षेत्रात कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. काही ठिकाणी दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग यासारख्या तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात, तर काही ठिकाणी उड्डाणपूल किंवा रस्त्यात बदल असे कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहेत.