दिवसभरात ८० मृत्यू; नवीन ४ हजार २५९ बाधितांचे निदान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दैनंदिन रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. मागील आठवड्याभरात दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजारांपेक्षा कमी होताना दिसत आहे. शनिवारी काेराेनाच्या ४ हजार २५९ रुग्णांचे निदान झाले असून ८० मृत्यूंची नोंद झाली.
राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख ७६ हजार ६९९ झाली असून मृतांची संख्या ४८ हजार १३९ वर पोहोचली आहे. सध्या ७३ हजार ५४२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४६ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.५७ टक्के आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १६ लाख ३८ हजार ३३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.१३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २५ हजार ६२३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ४ हजार ५०० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
* कालावधी (नवीन रुग्ण)
११ डिसेंबर (४ हजार २६८), १० डिसेंबर (३ हजार ८२४), ०९ डिसेंबर (४ हजार ९८१),
०८ डिसेंबर (४ हजार २६)
-----------------