उपनगरांत मुलींचा जन्मदर घसरतोय ही चिंताजनक बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:07 AM2020-12-29T04:07:20+5:302020-12-29T04:07:20+5:30

मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई उपनगरामध्ये १,००० मुलांमागे केवळ ७०३ मुलींच प्रमाण असल्याचे ...

The declining birth rate of girls in the suburbs is a matter of concern | उपनगरांत मुलींचा जन्मदर घसरतोय ही चिंताजनक बाब

उपनगरांत मुलींचा जन्मदर घसरतोय ही चिंताजनक बाब

Next

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई उपनगरामध्ये १,००० मुलांमागे केवळ ७०३ मुलींच प्रमाण असल्याचे धक्कादायक वास्तव नुकतेच राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे. हा सर्वेक्षण अहवाल दर पाच वर्षांनी प्रकाशित होतो. २०१५च्या सरासरी तुलनेमध्ये २०१९-२० मधील सरासरी मुलींचे प्रमाण दर हजारी मुलग्यांमध्ये ७०३ आले आहे. हे प्रमाण २०१५-२०१६ मध्ये ९३२ होते. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ म्हणत सर्व पातळ्यांवर मुलीचा जन्मदर वाढावा, म्हणून प्रयत्न सुरू असताना, मुलींचा जन्मदर घसरतोय ही अतिशय चिंताजनक बाब आहे, असे मत वर्सोवा विधानसभा क्षेत्रामध्ये मात्र वर्सोवाच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबई उपनगरातील वर्सोवा विधानसभा क्षेत्रात मात्र आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी ‘डॉटर्स ऑफ वर्सोवा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. मुलीचा जन्मदर वाढावा, तिचे जीवनमान सुधारावे, यासाठी त्यांच्या ''ती फाउंडेशन'' या त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असून, जनजागृती करतात.

''डॉटर्स ऑफ वर्सोवा'' या उपक्रमांतर्गत वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील नवजात मुलींच्या जन्माचे स्वागत डॉ.लव्हेकर स्वतः नवजात बालिकेच्या घरी अथवा रुग्णालयात जाऊन वा आपल्या कार्यालयात स्वागत करतात. नवजात बालिकांचे भेटवस्तू देऊन ‘लक्ष्मी आली घरा...’ म्हणून आनंदाने स्वागत केले जाते. स्वतः आमदार आपल्या बालिकेचे स्वागत करतात याचा अतिशय सकारात्मक सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोचतो. ''डॉटर्स ऑफ वर्सोवा'' हा उपक्रम त्यांनी २०१५ साली सुरू केला आणि आतापर्यंत त्यांनी १४,१७९ नवजात मुलींचे स्वागत केले आहे.

यापूर्वीही बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मुलींची संख्या वाढविण्यासाठी २०११ मध्ये त्यांनी ''ती फाउंडेशन''च्या माध्यमातून १२० गावांचा पूर्ण तालुका तीन वर्षांसाठी दत्तक घेतला होता. १५ ऑगस्ट, २०११ पासून तीन वर्षांपर्यंत जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर सहा हजार रुपयांचे एफडी बनवून बँकेत ठेवले होते. त्यावेळी १००० मुलांच्या तुलनेत ७३३ एवढी कमी झालेली मुलींची संख्या आता ९२१ पर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती त्यांनी अभिमानाने सांगितले.

-----------------------------------

Web Title: The declining birth rate of girls in the suburbs is a matter of concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.