समतानगर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाडच्या आक्सा बीचवर गुरुवारी एका महिलेचा मृतदेह प्लास्टीकच्या बॅगेत सडलेल्या अवस्थेत सापडला हाेता. त्या मृतदेहाची ओळख पटली आहे. कांदिवली पूर्वच्या समतानगर पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
नंदिनी कुमार (२२) असे मृत महिलेचे नाव आहे. ती कांदिवली पूर्वच्या पोईसर परिसरात पती आणि सासऱ्यांसोबत राहत होती. ११ डिसेंबर, २०२० रोजी ती घरातून अचानक बेपत्ता झाली. याची तक्रार घरच्यांनी समतानगर पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर २४ डिसेंबरला मालाडच्या आक्सा बीचवर प्लास्टीकच्या पिशवीत भरलेला सडलेल्या अवस्थेतील जाे मृतदेह पाेलिसांना सापडला ताे तिचाच असल्याचे समाेर आले आहे.
मालवणी पाेलिसांनी मृतदेह स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. तिच्या घरच्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. कालपाड यांनी दिली.
..................................