Join us  

सजली... साहित्य संमेलननगरी !

By admin | Published: February 03, 2017 3:32 AM

साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच संमेलनाचा मान मिळालेली आणि साहित्य-संस्कृतीच्या सातत्यपूर्ण उपक्रमांमुळे सतत चर्चेत असलेली डोंबिवली नगरी

डोंबिवली : साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच संमेलनाचा मान मिळालेली आणि साहित्य-संस्कृतीच्या सातत्यपूर्ण उपक्रमांमुळे सतत चर्चेत असलेली डोंबिवली नगरी सजून सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी घातलेल्या रांगोळ््यांच्या पायघड्या, शहरभर उभारलेल्या कमानी, स्वागताचे फलक आणि ग्रंथदिंडीची तयारी यामुळे सर्वत्र संमेलनाचे वातावरण तयार झाले आहे.वेगवेगळ््या क्षेत्रात मुशाफिरी करणारे साहित्यिक, राजकीय पक्षांचे नेते, शहरातील विविध संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळेतील मुले यांच्या सहभागामुळे संमेलनाची व्याप्ती दोन दिवसांत वाढत गेली.संमेलनासाठी क्रीडा संकुलात पु. भा. भावे साहित्यनगरी उभारण्यात आली आहे. डोम पद्धतीच्या मंडप उभारणीतून मुख्य मंडपासह तीन मंडप तयार झाले आहेत. त्यात ग्रंथदालन व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी मुख्य व्यासपीठ साकारले आहे. वेगवेगळ््या विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे, मुलाखती, कवीसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, सतत होणारी पुस्तक प्रकाशने अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी त्यात असेल. बालसाहित्य, महिला, युवक, नवोदित लेखक, भाषा अशा साहित्याच्या विविध कंगोऱ्यांवर त्यात चर्चा होईल.मुख्य मंडपात १२ हजार साहित्य रसिकांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. मंडपात लेखणीचा सेल्फी पॉईंट उभारला आहे. भव्य प्रवेशद्वार साकारले आहे. मुख्य व्यासपीठाला बुक शेल्फचा लूक दिला आहे. तीन लहान मंदिरांत गणेश, ज्ञानदेव, तुकोबा यांच्या मूर्ती साकारल्या आहेत. संमेलनाच्या मंडप उभारणीचे काम गुरूवारी रात्री पूर्ण झाले आहे. ग्रंथ दालनांची मांडामाड रात्री उशिरापर्यंत सुरु होती. प्रवेशद्वाराच्या सजावटीवर शेवटचा हात फिरवला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. (प्रतिनिधी)साहित्य शिल्पाच्या कोनशिलेवरील नावांना आचारसंहितेचा अडसरसाहित्य संमेलनाची कायम आठवण राहावी, यासाठी महापालिकेने सरस्वती शिल्प साकारले आहे. हे शिल्प तयार आहे. पण निवडणूक आचारसंहितेमुळे शिल्पाच्या कोनशिलेवर राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे टाकायची की नाही? त्याला आचारसंहितेचा अडसर येणार की नाही? याविषयी सरकारी पातळीवर रात्री उशिरापर्यंत खल सुरु होता. नावे रद्द करण्याचा विषय झाल्यास राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नावांशिवाय कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे.