नवी मुंबई : पामबिच रोडवरील वॉटर बॉडीचा विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.4क् हजार 6क्क् चौरस मीटर भूखंडावर उद्यान,जॉगिंग ट्रॅक व इतर कामे करण्यात येणार असून यासाठी 17 कोटी 63 लाख रूपये खर्च होणार आहेत.
नवी मुंबईचा क्विन नेकलेस म्हणून पामबिच रोडची ओळख आहे. या रोडवर नेरूळ सेक्टर 26 मध्ये नैसर्गीक वॉटर बॉडी (तलाव ) आहे. या तलावाचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीची दखल घेवून महापालिकेने सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे. तलावाच्या बाजूला 4क् हजार 6क्क् चौरस मिटरचा भूखंड आहे. या भूखंडावर उद्यान, अॅक्वेरीयम, बटरफ्लाय पार्क, अॅम्पी थिएटर, ज्वेल ऑफ नवी मुंबई, विविध प्रकारची शिल्पे, जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळणी, आसनव्यवस्था, वाहनतळ, व इतर कामे करण्यात येणार आहेत.
स्थायी समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली. आहे. एक वर्षात हे काम पूर्ण केले जाणार असून त्यासाठी 17 कोटी 63 लाख 4क् हजार रूपये खर्च होणार आहेत. अत्यंत महत्वाचा हा प्रस्तावही चर्चा न होताच मंजूर करण्यात आला. आमदार निधी व पालिकेच्या निधीतून हे
काम करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)