मुंबई- मुंबई सध्या विकासाच्या नावाखाली ती अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहेत. याचपार्श्वभूमीवर चिंचपोकळीतील श्रवण घोडके यांनी झाडांच्या पुनर्जन्मावर भाष्य करणारी सजावट केली आहे. या सजावटीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
श्रवण घोडके दरवर्षी घरगुती गणपतीची स्थापना करतात. यंदा ९५वे वर्षे असून सुरुवातीपासूनच घोडके कुटुंबीय आपल्या घरी सामाजिक देखावे सादर करून भाविकांचे समाजप्रबोधन करीत आहेत. यंदा घोडके कुटुंबीयांनी मुंबईतील अनेक जंगल वाचविण्यासाठी जनजागृती व इतर पर्यावरणसंदर्भात भाष्य करणारी सजावट केली आहे.
मुंबईचे वनक्षेत्र हे मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते. आरेच्या जंगलात बिबट्यांशिवाय जवळपास ३०० प्रजातींचे प्राणी आढळतात. आरेचे जंगल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडलेले आहे. इथं मुंबईच्या कानाकोपऱ्यातील लोक स्वच्छ प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. ही जंगले केवळ शहरातील लोकांना ताजी हवा देत नाहीत, तर वन्यजीवांसाठी एक प्रमुख स्थानिक अधिवास देखील आहेत, असे विविध संदेश या सजावटीमधून देण्यात आले आहे.