- अजय परचुरेमुंबई : नाट्यसंमेलनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या संमेलन परिसरातील सजावटीची धुरा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदा तरूण रंगकर्मींच्या खांद्यावर सोपवली असून म. ल. डहाणूकर कॉलेजचे २२ विद्यार्थी परिसराच्या कायापालटासाठी सज्ज झाले आहेत.मुलुंड येथील ९८ व्या नाट्यसंमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेची रचनाच त्याच्या साहित्याचा-नेपथ्याचा अविभाज्य भाग असलेल्या ट्रंकेच्या आकारात होती. तिच थीम सजावटीतही वापरली जाणार आहे.विशाल नवाथे आणि हर्षद माने हे डहाणूकर कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि रंगभूमीवर अतोनात प्रेम करणारे कलाकार. नेपथ्यकार म्हणून या जोडीने ‘हलकंफुलकं’ आणि ‘बालक पालक’ नाटकांचं नेपथ्य केलं आहे. मराठी रंगभूमीवरील अनेक फेस्टिव्हलमध्येही त्यांनी नेपथ्याचे कसब दाखवले आहे. या धडपडणाऱ्या रंगकर्मींवर नाट्यपरिषदेने सजावटीची जबाबदारी सोपवली आहे.रंगभूमीवरील कोणतेही नाटक असो त्यात संहिता, दिग्दर्शक, कलाकार, संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा, बॅकस्टेज, आर्र्टिस्ट याचबरोबर महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे नाटकाला लागणारे साहित्य ठेवण्याची ट्रंक. या ट्रंकेलाही नाटकाचा अनेक वर्षांचा इतिहास आहे. त्याला, त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी, हा आठवणींचा पेटारा ट्रंकेच्या प्रातिनिधिक माध्यमातून उलगडण्यासाठी मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ट्रंकांचाच वापर केला जाणार आहे. यासाठी ४० ट्रंक वापरल्या जातील. त्यांना रंगवून हे प्रवेशद्वार आकर्षक केले जाईल. त्यावर मराठी रंगभूमीवरील गाजलेल्या नाटकांची नावे आणि ज्यांनी खºया अर्थाने मराठी रंगभूमी जपली अशा मराठी नाट्यनिर्मिती संस्थांची नावे चितारण्यात येणार आहेत.जुन्या नाटकांची तिकीटेकालिदास नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून नाट्यगृहाच्या मुख्य दरवाजापर्यंतच्या १५० फूट जागेतही सजावट केली जाईल. येथे ग्रीन कार्पेट अंथरण्यात येईल. संपूर्ण पट्ट्यात रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांची तिकीटे लटकवली आहेत. कालिदास नाट्यगृहाच्या परिसरात ज्येष्ठ रंगकमींचे फोटो लावून त्यांच्या आठवणींना उजाळाही दिला जाणार आहे.समथिंग फिशी : विशाल नवाथे आणि हर्षद माने यांच्यासोबत डहाणूकरमधील विद्यार्थी यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. हे सर्व तरूण रंगकर्मी दरवर्षी एकांकिका स्पर्धेत आपले कसब दाखवतात. या नाट्यसंमेलनात पूर्वरंग कार्यक्रमात हेच विद्यार्थी मंगळवारी १० जूनला ‘समथिंग फिशी’ ही एकांकिकाही सादर करणार आहेत.
सजावटीची धुरा ‘डहाणूकर’च्या विद्यार्थ्यांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 1:19 AM