Join us

कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:07 AM

मुंबई - गणेशोत्सव काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मागच्या आठवड्यात रुग्णसंख्येत वाढ दिसून येत ...

मुंबई - गणेशोत्सव काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मागच्या आठवड्यात रुग्णसंख्येत वाढ दिसून येत होती. दररोज बाधित रुग्णांच्या आकड्यात घट होऊ लागली आहे. सोमवारी ३४७ कोरोना रुग्ण आढळले. सहा रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्येत घट होत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला आहे.

आतापर्यंत मुंबईत सात लाख ३५ हजार ४०३ रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी ४२० रुग्ण कोरोनामुक्त झाले. सात लाख १२ हजार १६२ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आता चार हजार ७४४ सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. दिवसभरात मृत्युमुखी पडलेल्या सहा रुग्णांना सहव्याधी होत्या. मृत्युमुखी पडलेले सर्व रुग्ण ६० वर्षांवरील पुरुष होते.

मात्र, चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. दिवसभरात २५ हजार ५८१ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ९७ लाख ४१ हजार ४५५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्येत घट होत असल्याने रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०६ टक्के एवढा आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १२७१ दिवसांवर पोहोचला आहे.