Join us

राज्यात दैनंदिन मृत्युंत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:07 AM

मुंबई : राज्यात सोमवारी २ हजार ५३८ रुग्ण आणि २८ मृत्युंची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांतील दैनंदिन मृत्युंत ...

मुंबई : राज्यात सोमवारी २ हजार ५३८ रुग्ण आणि २८ मृत्युंची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांतील दैनंदिन मृत्युंत झालेली ही कमालीची घट आहे, तर दिवसभरात ३ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आतापर्यंत ६३ लाख ४० हजार ७२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात सध्या ४१ हजार ६७२ रुग्ण उपचाराधीन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७१ लाख ६४ हजार ४०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.४१ टक्के नमुने पॅझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ७५ हजार ७३६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ६७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६५ लाख २४ हजार ४९८ असून, मृतांची संख्या १ लाख ३८ हजार ५४६ इतकी आहे.