मुंबईकरांना दिलासा; राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:30 AM2021-05-05T05:30:37+5:302021-05-05T05:31:00+5:30
२४ तासांत ५१ हजार ८८० रुग्ण, ८९१ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून आले. राज्यात दिवसभरात ५१ हजार ८८० रुग्ण आणि ८९१ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात दिवसभरात ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ४१ लाख ७ हजार ९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४८ लाख २२ हजार ९०२ झाली असून, मृतांचा आकडा ७१ हजार ७४२ झाला आहे. सध्या राज्यात ६ लाख ४१ हजार ९१० रुग्ण उपचाराधीन आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.१६ टक्के झाले असून मृत्युदर १.४९ टक्के आहे.
दिवसभरात नोंद झालेल्या ८९१ मृत्यूंमध्ये मुंबई ६२, ठाणे ९, ठाणे मनपा ३१, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा २१, भिवंडी निजामपूर मनपा ३, वसई विरार मनपा २, रायगड १५, पनवेल मनपा १४, नाशिक ३३, नाशिक मनपा १६, मालेगाव मनपा ६, अहमदनगर २९, नंदुरबार २३, पुणे २८, पुणे मनपा २५, सोलापूर २०, सोलापूर मनपा २२, सातारा १४, कोल्हापूर २९, कोल्हापूर मनपा ९, सांगली १९, सांगली मिरज कुपवाड मनपा ११, सिंधुदुर्ग ८, रत्नागिरी १५, औरंगाबाद ९, औरंगाबाद मनपा १, जालना २२, हिंगोली ६, परभणी ७, परभणी मनपा २, लातूर १२, लातूर मनपा ३, उस्मानाबाद १४, बीड ८, नांदेड २७, नांदेड मनपा ९, अकोला ५, अकोला मनपा ३, वाशिम ७, नागपूर २३, नागपूर मनपा ८४, वर्धा २०, भंडारा ११, गोंदिया ७, चंद्रपूर ३०, चंद्रपूर मनपा १२, गडचिरोली १६ इ. रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईकरांना दिलासा; कोरोना संसर्ग नियंत्रणात
लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने दिलासादायक आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. येथे रुग्णवाढीसोबतच मृतांचा आकडाही हळूहळू कमी होत आहे. मंगळवारीही मुंबईत रुग्णवाढ आणि मृतांच्या संख्येत घट झाली. मंगळवारी २ हजार ५५४ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ६२ मृत्यू झाले. साेमवारी २ हजार ६२४ रुग्ण आढळले हाेते, तर ७८ जणांनी काेराेनामुळे जीव गमावला हाेता. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ९० टक्के इतका झाला आहे. मुंबईत ५ हजार २४० जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत ५ लाख ९४ हजार ८५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दरही कमी झाला आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या १३ हजार ४७० इतकी आहे.
राज्यात आतापर्यंत
१ कोटी ६४ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस
nमुंबई : राज्यात सोमवारी ७९ हजार ४९१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण १ कोटी ६४ लाख ४६ हजार ९९४ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.
nराज्यात पहिला डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या
११ लाख ११ हजार ४२०
आहे, तर दुसरा डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या
६ लाख ३५ हजार ९८४ आहे. राज्यात पहिला डोस घेतलेल्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची संख्या १४ लाख ३६ हजार ६७०
आहे, दुसरा डोस घेतलेल्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाख ३३ हजार ३७ इतकी आहे.