एलबीटी उत्पन्नात 5 कोटींची घट

By admin | Published: September 21, 2014 02:27 AM2014-09-21T02:27:43+5:302014-09-21T02:27:43+5:30

उल्हासनगर महापालिकेचे एलबीटीचे उत्पन्न 13 कोटी रुपयांवरून 8 कोटी रुपये इतके कमी झाले आहे.

Decrease in LBT yield by 5 crores | एलबीटी उत्पन्नात 5 कोटींची घट

एलबीटी उत्पन्नात 5 कोटींची घट

Next
सदानंद नाईक ल्ल उल्हासनगर
उल्हासनगर महापालिकेचे एलबीटीचे उत्पन्न 13 कोटी रुपयांवरून 8 कोटी रुपये इतके कमी झाले आहे. थेट पाच कोटींची घट येऊनही उत्पन्न घटल्याप्रकरणी अधिका:यांवर कोणतीही कारवाई न करता पालिका आयुक्तांनी आचारसंहितेच्या नावाखाली केवळ कारणो दाखवा नोटिसा बजावल्याने नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 
उल्हासनगर पालिकेच्या एलबीटी विभागाचे उत्पन्न 13 कोटींवरून 8 कोटी इतके खाली आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला प्रचंड नुकसान झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. एलबीटी विभागप्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना पालिका सेवेतून कार्यमुक्त करण्याचा ठराव आणून योगेश गोडसे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली होती.
अधिका:यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांच्याकडील महागडय़ा गाडय़ा, राहणीमान, घरे आदींचा विचार करता त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणीही नगरसेवकांनी केली आहे.   अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भ्रष्टाचारात सहभागी असल्याने या विभागाकडून वसूल होणारे  एलबीटीचे उत्पन्न 13 वरून दरमहा 8 कोटींवर आल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे हा विभाग वादाच्या भोव:यात सापडला होता. या प्रकारामुळे  विभागातील सर्वच कर्मचा:यांची बदली करण्याची मागणीही नगरसेवकांनी केली आहे.
आचारसंहितेचे कारण पुढे करीत अधिका:यांवर पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी निलंबनाची व बदलीची कारवाई न करता उत्पन्न कमी आल्याबद्दल केवळ कारणो दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एलबीटी विभागांतर्गत नोंदवलेल्या 14 हजार व्यापा:यांच्या व्यवहाराचे कर पुनर्निर्धारणासाठी कौशल्यपूर्ण अधिका:यांची नियुक्ती करण्याची मागणी खतगावकर यांनी  शासनाकडे केली आहे.  पालिकेतील 75 टक्के कर्मचारी व अधिकारी विधानसभा निवडणूक कामात व्यस्त झाल्याने पालिकेची कामेही काही प्रमाणात थंडावल्याची कबुलीही आयुक्तांनी दिली आहे. 
 
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या अधिकारी व कर्मचा:यांवरील कारवाई आचारसंहितेमुळे टळली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्या पाश्र्वभूमीवरच या नोटिसाही बजावण्यात आल्याने अधिका:यांचे धाबे दणाणले आहेत.

 

Web Title: Decrease in LBT yield by 5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.