राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:07 AM2021-02-08T04:07:16+5:302021-02-08T04:07:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात १,६२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर आतापर्यंत एकूण १९,५५,५४८ करोनाबाधित रुग्ण बरे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात १,६२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर आतापर्यंत एकूण १९,५५,५४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६७% एवढे झाले आहे. राज्यात दिवसागणिक उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसतेय; सध्या ३५ हजार ९४८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रविवारी २,६७३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५७२ दिवसांवर
मुंबई : मुंबईत रविवारी ७११ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ९४ हजार १२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५७२ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ५ हजार ४४१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मुंबईत दिवसभरात ४४८ रुग्ण आणि ४ मृत्यूंची नोंद झाली आहे.