राज्यातील उपचाराधीन रुग्णांमध्ये चार हजारांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:07 AM2021-02-12T04:07:47+5:302021-02-12T04:07:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात ६,१०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण १९,७०,०५३ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात ६,१०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण १९,७०,०५३ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८४ टक्के झाले आहे. राज्यात बुधवारच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांनी कमी झाल्याचे दिसून आले. १० फेब्रुवारी रोजी राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३५ हजार ६३३ असल्याची नोंद होती, तर गुरुवारी ती ३०,२६५ हाेती.
राज्यात गुरुवारी ३,२९७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २५ मृत्यू झाले. परिणामी, बाधितांची एकूण संख्या २० लाख १९ हजार ९०५ तर बळींचा आकडा ५१ हजार ४१५ इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५१,६३,७८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,५२,९०५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६६,७८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.