Join us

भाजीपाल्याच्या दरात घट; पुरवठा वाढल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 1:13 AM

पाऊस कमी झाल्याने आवक वाढली

मुंबई : गेल्या महिन्यात जोरदार पावसामुळे नाशिक ,कोल्हापूर सांगली आदी जिल्ह्यातील गावे पाण्याखाली गेली होती. पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. परिणामी मुंबईतील भाज्यांची आवक घटली होती. भाज्यांचे दर दुपटीने वाढले होते. परंतु काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी झाले असून त्या ठिकाणचा भाजीपाला बाजारात येत आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे भाज्यांची आवक वाढली आहे. भाजी पाल्याचा जास्त पुरवठा झाल्यामुळे दरांमध्ये घट झाली आहे.

मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यातून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. नाशिक सातारा,पुणे, सांगली कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो़ गेले काही दिवस या जिल्हांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. येथून येणाऱ्या भाज्यांच्या अनेक गाड्या पावसामुळे महामार्गावरच अडकल्या होत्या . ज्या ठिकाणांहून भाजीपाला येतो, तिथे पावसाचा जोर अधिक असल्याने भाज्या खराब झाल्या होत्या. आता परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे़ भाजीपाला पुरवठा सुरळीत झाला आहे. या भागातून येणाºया भाजीपाल्याची आवक वाढली आहे़ सर्वच पालेभाज्यांचे दर घटले आहेत. मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

पाऊस झाल्यानंतर भाजीपाल्यांच्या गाड्यांची संख्या वाढली आहे़ महापुरामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्या तुलनेत भाजीपाला स्वस्त झाला आहे, असे भाजी विक्रेता सुवर्णा चव्हाण यांनी सांगितले....तर भाजीपाला आणखी स्वस्त होणारपावसामुळे भाज्यांचे पिकात वाढ झाली आहे. बाजारात भाज्यांच्या गाड्या जास्त येत आहेत. भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे भाजी स्वस्त झाली आहे. आवक आणखी वाढल्यास भाजीपाला आणखी स्वस्त होईल. - लक्ष्मण बोरजे, भाजी विक्रेता

किरकोळ दर पूर्वीचे दर(प्रतिकिलो दर ")भेंडी " ८०  -  १०० ते १२०टोमॅटो " ४०  -  ७० ते ८०गवार " ६० -  ८० रुपयेशिमला मिरची " ६० - ८० ते १००

किरकोळ दर पूर्वीचे दरकारले " ६० " ७० ते ८०वांगी " ६० " ८०फ्लॉवर " ४० " ८०मेथी " ३० " ७० (जुडी )शेपू " २५ " ८० (जुडी )