Join us

D.Ed कोर्स कायमचा बंद होणार? नव्या शैक्षणिक धोरणात नवा अभ्यासक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 2:02 PM

आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार डीएड कोर्स कायमचा बंद होणार असल्याचे समजते.  

मुंबई - कधी काळी डी.एड. म्हणजे शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा हा सर्वात प्रतिष्ठेचा कोर्स मानला जायचा. आपल्या मुलांनी डी.एड करावं आणि शिक्षक व्हावं असं स्वप्न महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घरोघरी पाहिलं जायचं. याच डी.एड.च्या प्रवेश प्रक्रियांसाठी, किंवा पाल्याच्या शिक्षणासाठी वडिलांनी आपल्या शेतजमिनी गहाण ठेवल्या होता, याच डीएडसाठी काही वेळप्रसंगी जमिनीही विकल्या. पण, मुलांचं डीएड पूर्ण केलं. मात्र, आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार डीएड कोर्स कायमचा बंद होणार असल्याचे समजते.  

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला डीएडचा (D.Ed) अभ्यासक्रम  कायमचं बंद होण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्याऐवजी आता बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना बीएड (B.Ed) करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे त्यात स्पेशलायझेशनही असणार आहे. केंद्र सरकारने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचा माहिती आहे. 

केंद्र सरकारच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार अकृष विद्यापिठांमध्ये जून २०२३-२४ पासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यामध्ये, डी.एड हा अभ्यासक्रम नसणार आहे. त्यामुळे, कधीकाळी अतिशय प्रतिष्ठेचा आणि मेरीटवर स्पर्धात्मक ठरलेला डीएड कोर्स आता इतिहासजमा होणार आहे. डी.एड करुन नोकरी मिलवलेल्या शिक्षकांनाही आता डी.एड. च्या केवळ आठवणीच उरल्या आहेत, असेच म्हणावे लागेल. 

नव्या धोरणानुसार बी.एड अभ्यासक्रम

नव्या शैक्षणिक धोरणानुसार १२ वीनंतर ४ वर्षांचा बी.एड कोर्स असणारपदवी घेतलेल्या उमेदवारांना दोन वर्षात बीएड पूर्ण करता येईल.पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एका वर्षात बी.एड करता येईल. स्पेशलायजेशनसाठी विद्यार्थ्यांना विषयाची निवड करता येईल.

टॅग्स :शिक्षणशिक्षकशेतकरी