‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’! रस्त्यात अपघात, DCM शिंदेंनी ताफा थांबवला; जखमींना केली तत्काळ मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 18:35 IST2025-01-26T18:34:50+5:302025-01-26T18:35:18+5:30

Deputy CM Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा प्रत्ययाला आली आहे, असे म्हटले जात आहे.

dedicated to common man deputy cm eknath shinde stopped the convoy and provided immediate assistance to the injured in road accident | ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’! रस्त्यात अपघात, DCM शिंदेंनी ताफा थांबवला; जखमींना केली तत्काळ मदत

‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’! रस्त्यात अपघात, DCM शिंदेंनी ताफा थांबवला; जखमींना केली तत्काळ मदत

Deputy CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे सातत्याने हे सर्वसामान्यांचे सरकार असून, सर्वसामान्यांना मदत करणारे सरकार आहे, असे सांगत असत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे केवळ बोलत नसत, तर कृतिशील निर्णय, धोरणे, मदतीसाठी पुढे येण्याचा स्वभाव यांमुळे एकनाथ शिंदे राज्यभरात लोकप्रिय झाले. एकनाथ शिंदे किती संवेदनशील आहेत, याचा अनेकदा अनुभव राज्यातील नागरिकांना घेतला आहे. मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ धावून जात रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तत्काळ मदत केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथील ध्वजवंदन आणि संचलन सोहळा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडून मुंबईला जात होते. एकनाथ शिंदे यांचा ताफा पूर्व द्रुतगती महामार्गावरून घाटकोपर जवळ आला असता अचानक रस्त्यावर त्यांना एका दुचाकीचा अपघात होऊन तरुण जखमी झाल्याचे दिसले. तत्काळ एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा रस्त्याच्या बाजूला घेत गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली. 

ताफ्यातील वाहन आणि पोलीस सोबत देऊन रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

दुचाकीवरून पडल्याने या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तत्काळ अन्य तरुणांच्या मदतीने जखमी तरुणाला उचलून रुग्णालयात न्यायला सांगितले. एवढेच नव्हे तर आपल्या ताफ्यातील वाहन आणि पोलीस सोबत देऊन या तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल करायला सांगितले. तू सुखरूप आहेस काळजी करू नकोस, आपण तुला पूर्ण बरे करू, असे सांगून जखमी तरुणाला आधार दिला. एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील सर्वांनीच उपमुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलपणा स्वत: पाहिला. रस्ते अपघातात जखी झालेल्या युवकाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे हे नेहमी मी 'सीएम' म्हणजे 'चीफ मिनिस्टर' नसून मी 'सीएम' म्हणजेच 'कॉमन मॅन' आहे असे आवर्जून सांगायचे. आता उपमुख्यमंत्री म्हणजे 'डिसीएम' झाल्यावर आपण 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन' असल्याचे ते म्हणाले होते. 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन' असल्याचे एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिले आहे, असे सांगितले जात आहे.

Web Title: dedicated to common man deputy cm eknath shinde stopped the convoy and provided immediate assistance to the injured in road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.