येत्या मंगळवारी दिंडोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:06 AM2021-02-15T04:06:27+5:302021-02-15T04:06:27+5:30

मुंबई : दिंडोशी येथील म्हाडा संकुल व नागरी निवारा परिषद या चार रस्त्यात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ...

Dedication ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj Chowk at Dindoshi on Tuesday | येत्या मंगळवारी दिंडोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा लोकार्पण सोहळा

येत्या मंगळवारी दिंडोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा लोकार्पण सोहळा

Next

मुंबई : दिंडोशी येथील म्हाडा संकुल व नागरी निवारा परिषद या चार रस्त्यात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक लोकार्पण सोहळा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे, अशी माहिती प्रभाग क्रमांक ४१ चे नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी दिली.

या विषयावर गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापले होते. दिंडोशी तालुका मनसे अध्यक्ष अरुण सुर्वे यांनी या चौकाचा लोकार्पण सोहळा करण्याचा इशारा दिला होता, तर प्रभाग क्रमांक ४१ चे मनसे शाखाध्यक्ष विजय वोरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसंदर्भात आक्षेप घेत प्रश्न उपस्थित केले होते. तर दुसरीकडे सकल मराठा मराठा समाजाने मूर्तीचे पुनर्निर्माण केल्यावर लोकार्पण करण्याची मागणी केली होती. लोकमतने या संदर्भात सातत्याने वृत्त दिले होते.

Web Title: Dedication ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj Chowk at Dindoshi on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.