मुंबई - दिंडोशी प्रभाग क्रमांक ४१ मध्ये ४८ आसनी दुमजली शौचालयाचा लोकार्पण सोहळा काल शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, माजी महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते संपन्न झाला.
प्रभाग क्रमांक ४१ चे नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. येथे सुसज्ज शौचालय उभारण्याची येथील उत्तर भारतीय नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती. ती येथील ४८ आसनी दुमजली शौचालयाच्या उभारणीमुळे पूर्ण झाली.
यावेळी दिंडोशी विधानसभा समन्वयिका आशा केणी, उपविभाग समन्वयक विनिता विचारे, शाखाप्रमुख संपत मोरे, महिला शाखा संघटक सुनंदा सकपाळ, कोयना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संपत उतेकर, जितेंद्र गुप्ता, नयना मगर तसेच सर्व महिला-पुरुष उपशाखाप्रमुख गटप्रमुख. प्रमुख कार्यकर्ते आणि उत्तर भारतीय महिला पुरुष उपस्थित होते.