लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिंडोशी विधानसभा मतदार संघातील मालाड पूर्व कुरार व्हिलेज येथील नवीन आधारकार्ड केंद्राचे लोकार्पण बुधवारी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.
या केंद्रावर नवीन आधारकार्ड बनवणे, आधारकार्डमधील दुरुस्ती, स्मार्ट आधारकार्ड यासारख्या सुविधा पुरविण्यात येतील. शासनाच्या कोविड नियमांचे पालन करून या केंद्राचे उद्घाटन केल्याची माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली.
यावेळी विधानसभा संघटक प्रशांत कदम, विष्णू सावंत, रिना सुर्वे, पूजा चौहान, उपविभाग संघटक गणपत वारिसे, प्रदीप निकम, नगरसेवक आत्माराम चाचे, महिला उपविभाग संघटक रुचिता आरोसकर, सानिका शिरगावकर, शाखाप्रमुख अशोक राणे, मनोहर राणे, विजय गावडे, महिला शाखा संघटक कृतिका शिर्के, संजीवनी रावराणे व शिवसैनिक तसेच नागरिक उपस्थित होते. आमदार प्रभू यांच्या माध्यमातून व युवा सेना मुंबई समन्वयक समृद्ध शिर्के, शिवसैनिक सचिन कदम यांच्या आयोजनाखाली कुरार व्हिलेज येथे सुरु झालेले नवीन आधारकार्ड केंद्र उपयुक्त ठरणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
............................................................