लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहिसर प्रभाग क्रमांक ७ मधील दहिसर विठ्ठल मंदिराच्या बाजूला असलेल्या समाजकल्याण केंद्रातील लसीकरण केंद्राचे साेमवारी लाेकार्पण करण्यात आले.
शिवसेनेच्या प्रवक्त्या व स्थानिक शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. पहिल्या दिवशी तब्बल १०० नोंदणी केलेल्या नागरिकांना लस देण्यात आली.
लाेकार्पण सोहळा साेमवारी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अध्यक्षा राजूल पटेल, शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते झाला.
यावेळी मुंबईच्या माजी महापौर डॉ.शुभा राऊळ तसेच प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता उद्देश पाटेकर, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, परिमंडळ ७चे उपायुक्त विश्वास शंकरवार, आर-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्ता संध्या नांदेडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश वायदंडे आणि इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.
येथे ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे, यासाठी आगाऊ ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. दहिसर प्रभाग क्रमांक ७ कोविड लसीकरण केंद्राची सुरुवात म्हणजे कोरोना विषाणूमुक्त प्रभागासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे, असा विश्वास नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केला.
.............................................................