दिंडोशी प्रभाग क्रमांक ४० येथील लसीकरण केंद्राचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:06 AM2021-05-11T04:06:51+5:302021-05-11T04:06:51+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दिंडोशी प्रभाग क्रमांक ४० रिद्धी गार्डन महापालिका दवाखान्यात साेमवारी लसीकरण केंद्र सुरू झाले. त्यामुळे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिंडोशी प्रभाग क्रमांक ४० रिद्धी गार्डन महापालिका दवाखान्यात साेमवारी लसीकरण केंद्र सुरू झाले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आता दूर लसीकरणासाठी जावे लागणार नाही.
आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
मुंबईचे उपमहापौर व प्रभाग क्र. ४० चे स्थानिक नगरसेवक अॅड. सुहास वाडकर यांच्या प्रयत्नाने व मनपा पी/उत्तर विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा बारस्कार व कार्यकारी अभियंता शिवशांत डोके यांच्या सहकार्यामुळे पालिकेच्या पी/उत्तर विभाग अंतर्गत प्रभाग क्र. ४० मधील जनतेसाठी नवीन कोविड - १९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच रिद्धी गार्डन महानगरपालिका दवाखान्याचे लोकार्पण ही आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.
या केंद्रात सकाळी ९ ते ५ यावेळेत लसीकरणासाठी आधी ऑनलाईन नोंदणी केलेल्या व ४५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना लस घेता येईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळे वयोगट १८ ते ४४ मधील नागरिकांना मोफत लस मिळणार आहे. राज्य शासन व मुंबई महानगरपालिका आणि अनेक सेवाभावी संस्था व राजकीय पक्ष कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठे योगदान देत असल्याचे गौरवोद्गार आमदार सुनील प्रभू यांनी यावेळी काढले. या प्रभागातील वयोगट ४५ पुढील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणासाठी ॲपवर पूर्वनोंदणी करून लस घ्यावी तसेच कोविड - १९ पासून बचावासाठी मास्क नियमित वापरा, वारंवार हात धुवा सुरक्षित अंतर राखा या त्रिसूत्रीचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी दिंडोशी विधानसभा संघटक प्रशांत कदम, विधानसभा समन्वयक आशा केणी, उपविभाग प्रमुख भाई परब, उपविभाग संघटक विद्या गावडे, उपविभाग समन्वयक प्रशांत घोलप, शाखा प्रमुख संदीप जाधव, महिला शाखा संघटक पदमा राऊळ, स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
----------------------- -- - ---------------------