लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाड पश्चिम येथील मढ दर्यामाता चर्च पटांगण, मढ आयलंड येथील नव्या लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा बुधवारी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी मढ चर्चचे फादर गोन्सालो परेरा उपस्थित होते.
विभागप्रमुख सुधाकर सुर्वे व महिला विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली पी / उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा व प्रभाग क्रमांक ४९ च्या स्थानिक नगरसेविका संगीता संजय सुतार यांनी येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे
पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाने मालाड पश्चिम मढ येथे मुंबई महानगरपालिकेतर्फे लसीकरण केंद्र बुधवारपासून सुरू झाले. येथे ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यामुळे आता येथील नागरिकांना लसीकरणासाठी १० ते १५ किमी दूर जावे लागणार नाही.
याप्रसंगी पी / उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार, पी / उत्तर आरोग्य अधिकारी ऋतुजा बारस्कर, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, समाजसेवक संजय सुतार, मालाड विधानसभा संघटक अनिल भोपी, मालाड विधानसभा प्रभारी किरण कोळी, कांदिवली (पू.) विधानसभा संघटक संतोष धनावडे, युवा सेना सह सचिव नितीन कास्कर, महिला उपविभाग संघटक जयश्री म्हात्रे, शाखाप्रमुख संदेश घरत, महिला शाखा संघटक संगीता कोळी, श्री हरबादेवी ग्रामदेवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष महेश पाटील, सुधाकर गुरव, विजय यादव, पुरूष व महिला उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक व मढ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------- -------