Join us

प्रस्तावित परिवहन सेवेला निधीचा खोडा

By admin | Published: November 04, 2015 1:05 AM

पनवेल शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्याअनुषंगाने लोकसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल नगर परिषदेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे.

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबईपनवेल शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्याअनुषंगाने लोकसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल नगर परिषदेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु अनुदानाअभावी या प्रकल्पाला खीळ बसली आहे. असे असले तरी परिवहन सेवा सुरू करण्याच्या मुद्द्यावर नगर परिषद ठाम आहे. निधीची उपलब्धता होताच ही सेवा सुरू करण्याचा चंग प्रशासनाने बांधला आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचा नैना प्रकल्प, मेट्रो आदीमुळे पनवेल शहराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. भविष्यात या क्षेत्रात विकासाला मोठ्या प्रमाणात संधी आहेत. त्यामुळे बड्या गुंतवणूकदारांनी आपले लक्ष पनवेल परिसरावर केंद्रित केले आहे. त्यामुळे या परिसरात नवनवीन गृहप्रकल्पांचे पेव फुटले आहे. या क्षेत्रात सर्वसामान्यांच्या बजेटमधील घरे तयार होत असल्याने चाकरमान्यांचा ओढा आता पनवेलकडे वाढू लागला आहे. याचा परिणाम म्हणून पनवेल शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडू लागला आहे. विशेषत: परिवहनसारख्या सेवेची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कार्यवाही सुद्धा सुरू करण्यात आली. निधीसाठी जेएनएनयूआरएमकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. इतकेच नव्हे, तर वाहननिर्मित्ती कंपनीला १४0 बसेसची आॅर्डरही देऊन टाकली. परंतु याच काळात केंद्राने जेएनएनयूआरएम ही योजना बंद केली. परिणामी परिवहन सेवा सुरू करण्याच्या नगर परिषदेच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. नगर परिषदेकडून प्रस्ताव पाठविण्यास विलंब झाल्याने जेएनएनयूआरएमकडून अनुदान नाकारण्यात आल्याचे बोलले जात आहे. पनवेल नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी मंगेश चितळे यांनी मात्र याचा नकार दिला. केंद्राच्या सूचनेनुसार १0 मार्च २0१५ पर्यंत आम्ही केंद्राकडे अनुदानाचा प्रस्ताव सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता प्रतीक्षा अमृत योजनेचीकेंद्र शासनाने जेएनएनयूआरएम योजना बंद केली असली तरी त्याऐवजी अमृत ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आता परिवहन सेवा सुरू करण्यासाठी अनुदान उपलब्ध केला जाणार आहे. या योजनेसंदर्भात मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच अनुदानासाठी पुन्हा प्रस्ताव पाठविला जाईल, असे पनवेल नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मंगेश चितळे यांनी सांगितले.सेवेला उत्स्फूर्त प्रतिसादनवी मुंबई महापालिकेने पनवेलकरांच्या विनंतीनुसार अलीकडेच शहरवासीयांसाठी एनएमएमटीची सेवा सुरू केली आहे. त्याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रहिवाशांच्या मागणीनुसार येत्या काळात पनवेलच्या आणखी काही भागात एनएमएमटीचा विस्तार करण्याची योजना असल्याचे परिवहनच्या व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.