दहिसरमध्ये डिम्ड कॉन्व्हेयन्स मार्गदर्शन शिबिर संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:06 AM2021-01-18T04:06:32+5:302021-01-18T04:06:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: दहिसर (पूर्व) येथील प्रभाग क्र. ३ चे शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी प्रभागातील नागरिकांसाठी डिम्ड ...

Deemed Convenience Guidance Camp held at Dahisar | दहिसरमध्ये डिम्ड कॉन्व्हेयन्स मार्गदर्शन शिबिर संपन्न

दहिसरमध्ये डिम्ड कॉन्व्हेयन्स मार्गदर्शन शिबिर संपन्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: दहिसर (पूर्व) येथील प्रभाग क्र. ३ चे शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी प्रभागातील नागरिकांसाठी डिम्ड कॉन्व्हेयन्स मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नुकतेच केले होते. या शिबिर सत्रात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी आणि सभासदांना मार्गदर्शन करण्याचा योग डीम्ड कन्व्हेयन्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, मुंबई या संस्थेच्या ज्येष्ठ कायदेशीर तज्ज्ञ तसेच इतर पदाधिकाऱ्यांना मिळाला. ॲड. अजित मांजरेकर यांनी ‘मानीव अभिहस्तांतरण’ या विषयावर तपशीलवार माहिती देऊन सर्वांच्या शंकांचे योग्य ते निरसन केले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत मानीव अभिहस्तांतरण विशेष मोहीम संदर्भात विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते झाले.

असोसिएशनतर्फे सदर मोहीम यशस्वी होण्याच्या आनुषंगाने सर्व पात्र गृहनिर्माण संस्थांनी आवश्यक प्रस्ताव सादर करून मुदतीत अर्ज निकाली काढण्यासाठी या विशेष मोहिमेद्वारे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या मार्गदर्शनपर शिबिरासाठी प्रभागातील संस्थांच्या सभासदांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता उपस्थित मान्यवर आणि संस्थांचे सभासद, तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

--------------------------------

Web Title: Deemed Convenience Guidance Camp held at Dahisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.