एका दिवसात ३१६ किलोमीटर रस्ते चकाचक; ८५ मेट्रिक टन राडारोडा, ६५ मेट्रिक टन कचरा साफ

By जयंत होवाळ | Published: June 8, 2024 08:28 PM2024-06-08T20:28:23+5:302024-06-08T20:29:02+5:30

गेल्या २९ आठवड्यांपासून १ हजार २२० कामगार, कर्मचारी १७१ संयंत्रांच्या सहाय्याने ही मोहीम राबवत आहेत.

Deep cleaning campaign by Mumbai Municipal Corporation for pre-monsoon preparations | एका दिवसात ३१६ किलोमीटर रस्ते चकाचक; ८५ मेट्रिक टन राडारोडा, ६५ मेट्रिक टन कचरा साफ

एका दिवसात ३१६ किलोमीटर रस्ते चकाचक; ८५ मेट्रिक टन राडारोडा, ६५ मेट्रिक टन कचरा साफ

मुंबई : मान्सूनपूर्व तयारीसाठी मुंबई महापालिकेने सखोल स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. याचा एक भाग म्हणून शनिवारी दिवसभरात विविध वाॅर्डांमधील ३१६ किलोमीटर लांबीचे रस्ते चकाचक करण्यात आले. ८५ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), २५ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ६५ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

गेल्या २९ आठवड्यांपासून १ हजार २२० कामगार, कर्मचारी १७१ संयंत्रांच्या सहाय्याने ही मोहीम राबवत आहेत. तसेच जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध वाहने आणि फायरेक्स मशीन, मिस्टींग मशीनसह अन्य अद्ययावत यंत्रणाही दिमतीला आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबू नये म्हणून ही मोहीम युद्धपातळीवर राबविली जात आहे.

याठिकाणी केली स्वच्छता

ए विभागात संग्रहालय विभाग, गणेशनगर, कुपरेज मार्ग, नाथालाल पारेख मार्ग, डी विभागात पठ्ठे बापूराव मार्ग, एफ उत्तर विभागात एडनवाला मार्ग, माहेश्वरी उद्यान ते पाच उद्यान मार्ग, जी दक्षिण विभागात मुरारी घाग मार्ग, एच पूर्व विभागात माहीम काॅजवे ते मिलन सब वे, वाकोला पोलिस ठाणे परिसर, के पूर्व विभागात प्रभाग ८६ मधील झोपडपट्टी व तत्सम परिसर, के पश्चिम विभागात वेसावे येथील मत्स्यपालन विद्यापीठ मार्ग, सुंदरवाडी, बद्रीनाथ टॉवर, एल विभागात कुर्ला पूर्व येथील स. गो. बर्वे मार्ग, मदर डेअरी मार्ग, एम पूर्व विभागात शरदवाडी चेंबूर, एन विभागात घाटकोपर पश्चिम येथील वर्षानगर मार्ग, पी दक्षिण विभागात आरे मार्ग, पी उत्तर विभागात मालाड पश्चिम येथील जोडरस्ता, स्वामी विवेकानंद मार्ग, आर दक्षिण विभागात कांदिवली पश्चिम येथे नवा जोड मार्ग, आर उत्तर विभागात दहिसर पश्चिम, आर मध्य विभागात गणेश मंदिर मार्ग, सोनी केबल मार्ग, संस्कृती मार्ग, सिद्धार्थनगर, टी विभागात मुलुंड आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

Web Title: Deep cleaning campaign by Mumbai Municipal Corporation for pre-monsoon preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.