सखोल भागांचे ‘डबके’ होणार नाही!

By Admin | Published: February 8, 2016 04:12 AM2016-02-08T04:12:04+5:302016-02-08T04:12:04+5:30

रेतीबंदरमधील ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर, रे रोड रेल्वे स्थानक परिसर, दिनशॉ पेरीट मार्ग, हिंदमाता, जीजीभॉय मार्ग, अभ्युदय नगर, सरदार हॉटेल, दत्ताराम लाड मार्ग, मडकेबुवा चौक,

Deep parts will not be 'puddle'! | सखोल भागांचे ‘डबके’ होणार नाही!

सखोल भागांचे ‘डबके’ होणार नाही!

googlenewsNext

मुंबई : रेतीबंदरमधील ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर, रे रोड रेल्वे स्थानक परिसर, दिनशॉ पेरीट मार्ग, हिंदमाता, जीजीभॉय मार्ग, अभ्युदय नगर, सरदार हॉटेल, दत्ताराम लाड मार्ग, मडकेबुवा चौक, लालबाग, काळाचौकी, स्टार सिनेमा, भायखळा स्टेशन परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व आचार्य दोंदे मार्ग जंक्शन या १३ ठिकाणांना पावसाळ्यात दिलासा मिळणार आहे. मुंबई शहरात थोडा जरी पाऊस झाला, तरी ही १३ ठिकाणे जलमय होतात. परिणामी, शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते.
महापालिकेद्वारा रेतीबंदर येथे ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनचे बांधकाम सुरू आहे. या कामाची, तसेच भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरण कामांची महापौर स्नेहल आंबेकर यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. या आढाव्याच्या वेळी अधिकारी वर्गाने या संबधीची माहिती महापौरांनी दिली.
भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय नूतनीकरण कामाची, तसेच नव्याने विकत घेतलेल्या लगतच्या मफतलाल मिलच्या जागेची पाहणीही या वेळी करण्यात आली. सद्यस्थितीमध्ये इंटरप्रीटेशन सेंटर इमारतीच्या आतील रचनेची (हम्बोल्ट पेंग्विन पक्षीगृह, थिएटर, मत्सालय, कॅफेटेरिया) कामांकरिता निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ६ हम्बोल्ट पेंग्विन पक्षी आणण्याकरिता संस्थेची निवड करण्यात आली असून, आॅगस्टपर्यंत हे पक्षी येथे आणण्यात येतील, असे अधिकारी वर्गाने या वेळी नमूद केले. (प्रतिनिधी)

Web Title: Deep parts will not be 'puddle'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.