Join us

‘दीपज्योतीनमोस्तुते’ने दिवाळी होणार समृद्ध

By admin | Published: October 29, 2016 3:59 AM

फटाके, प्रदूषण यांना दूर सारून आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची पर्वणी गणेशभक्त रसिकांना मिळणार आहे. श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे

मुंबई : फटाके, प्रदूषण यांना दूर सारून आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची पर्वणी गणेशभक्त रसिकांना मिळणार आहे. श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे, ‘दीपज्योतीनमोस्तुते’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्तसुरांच्या साक्षीने मान्यवरांच्या मांदियाळीत ‘दीपोत्सव व पुरस्कार सोहळा’ हा भव्य सोहळा आयोजिला आहे. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. २९ आॅक्टोबर रोजी शनिवारी सायंकाळी ७ ते १० या वेळेत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. दिवाळी सांज अधिकच मंगलमय करण्यासाठी मराठी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची मांदियाळी उपस्थित राहणार आहे. पुष्कर श्रोत्री, सुदेश भोसले, पूर्वा भावे, दीपाली सय्यद, मंगेश बोरगावकर, भार्गवी चिरमुले, अजित परब, विजय कदम, पुष्कर जोग, पद्मश्री कदम, केतकी पालव, नंदेश उमप असे कलाकार रसिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाला सुरमयी संगीताची झालरही आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देऊन या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)गणेशभक्त रसिकांसाठी ‘दीपोत्सव’ विशेष सवलतीतयंदा लोकमत ‘दीपोत्सव’ची समृद्ध मैफल ‘प्रवास’ या सूत्राभोवती गुंफलेली आहे. त्याचबरोबर रतन टाटा, प्रिसिला चान, गिरिजा देवी, विक्कु विनायकराम यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ हा दिवाळी अंक रसिकांना सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे.