लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचा पती आणि आरोपी दीपक कोचर याचा जामीन विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. पी.पी. राजवैद्य यांनी फेटाळला. व्हिडिओकॉन ग्रुप कंपनीला बेकायदा १,८७५ कोटी आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज देण्यात आल्याने ईडीने कोचरवर गुन्हा नोंदविला आहे.