'दीपाली सय्यद बनल्या सोफिया सय्यद'; पाकिस्तानी नागरिकत्त्व स्वीकारल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 19:43 IST2023-04-03T19:42:34+5:302023-04-03T19:43:42+5:30

दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे

'Deepali Syed becomes Sophia Syed'; Claim to have accepted Pakistani citizenship, allegation by bhausaheb shinde | 'दीपाली सय्यद बनल्या सोफिया सय्यद'; पाकिस्तानी नागरिकत्त्व स्वीकारल्याचा दावा

'दीपाली सय्यद बनल्या सोफिया सय्यद'; पाकिस्तानी नागरिकत्त्व स्वीकारल्याचा दावा

अभिनेत्री आणि शिंदे गटात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिला नेत्या दीपाली गेल्या हे नाव गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून दीपाली सय्यद यांचा मीडियातील वावर कमी झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अनुषंगाने त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. मात्र, सातत्याने राजकीय स्टेटमेंट करत असल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. आता, पुन्हा एकदा दीपाली सय्यद चर्चेत आल्या आहेत. मात्र, त्यांच्या स्वीय सहायकाने केलेल्या दाव्यामुळे त्या चर्चेत आहेत. 

दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. पाकिस्तानमध्ये दीपाली सय्यद यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा खळबळजनक दावा त्यांचे स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वीही शिंदे यांनी दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड दाऊद गँगशी आर्थिक संबंध असल्याचा गौप्यस्फोट केला होता.

दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी आणि त्याच्या बायकोशी संबध आहेत. तसेच लंडन, दुबई येथे त्यांची मालमत्ता आहे, असा गंभीर आरोपही भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. तसेच, मी याबाबत शासनाला पुरावेही दिले आहेत, त्यांच्या बँकेचा तपशील दिला असून दीपाली यांच्याकडे बनावट पाकिस्तानी पासपोर्ट असल्याचेही त्यांनी म्हटले. मी प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी करत आहे, पण याची कोणीही दखल घेत नाही, असा आरोपही भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. 
 

Web Title: 'Deepali Syed becomes Sophia Syed'; Claim to have accepted Pakistani citizenship, allegation by bhausaheb shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.