मुंबई : फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर सध्या संपूर्ण दिवाळीचे वातावरण असून नेटिझन्स अक्षरश: ‘दिवाळीमय’ झाले आहेत. त्यात व्हॉट्सअॅपवरच्या स्टिकर्सने तर नेटिझन्सना भुरळ घातली असून, हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.फेसबुकवरही घरा-घरांतील दिवाळी, रांगोळी आणि कुटुंबाच्या एकत्र दिवाळ सणाचे फोटो शेअर होताना दिसत आहेत. याशिवाय, इन्स्टाग्रामवरही स्टोरीच्या माध्यमातून दिवाळीचे वेगवेगळे मूड्स शेअर करत आहेत. तर परदेशात राहणाऱ्या नातेवाइकांना आॅनलाइन भेटवस्तू पाठविल्या जाऊ लागल्या आहेत. शिवाय, परदेशातील आप्तेष्टांशी व्हिडीओ कॉल्सवर बोलण्याचा आनंदही लुटत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक, हाइक आदी सोशल मीडियावर दिवाळीचा उत्साह जाणवत असून, स्टिकर्स, मेसेजिंग, इ-ग्रीटिंग्ज, अॅनिमेटेड ग्रीटिंग्ज व व्हिडीओजमधून शुभेच्छा देत आहेत.स्टेट्सवर दिवाळीचे प्रतिबिंबदिवस सुरू झाल्यापासून ते रात्रीच्या वेळी आतषबाजी करण्यापर्यंतचे सगळ्या पोस्ट्स, फोटोस व्हॉट्सअॅप स्टेटस मध्ये नेटिझन्स अपडेट करताना दिसत आहेत. या स्टेटसला अन्य युझर्सकडून दाद मिळत असून, सोशल मीडियावरही दिवाळी हा चर्चेचा विषय ठरत आहे.वृद्धाश्रमातदिवाळी साजरीमुंबई : जॉय आॅफ गिव्हिंग या सोशल माध्यमावरील ग्रुपच्या वतीने दीपावली निमित्त जोगेश्वरी येथील डॉ. निरंजन वाघ यांचे होम फॉर द एजेड या वृद्धाश्रमात मदतीचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. वृद्धाश्रमात अठरा महिला व बारा पुरुष असे तीस वृद्ध वास्तव्यास असून त्यांना वस्त्रांसह जीवनावश्यक वस्तू व खाद्यपदार्थ भेट देत दिवाळी साजरी आली. नवी मुंबईच्या अडवली भुतावली येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमात ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली होती, अशी माहिती गणेश हिरवे यांनी दिली.परदेशी विद्यार्थ्यांनी अनुभवला दीपोत्सवसमृद्ध भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी, तसेच आपली संस्कृती समुद्रापार पोहोचविण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे परदेशी विद्यार्थ्यांसोबत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते़ विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील दीक्षान्त सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. विद्यापीठात शिक्षण घेणाºया जर्मनी, इजिप्त, मादागास्कर, साउथ सुदान, नायजेरिया कॉँगो, व्हिएतनाम, भूतान, सौदी अरेबिया, नायझेरिया, युगांडा, थायलंड, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान आणि यूएई यासह अनेक देशातून सुमारे ११२ विद्यार्थ्यांना प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.दीपोत्सव या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आणि परदेशी विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत, भक्तिपर गीते, गझल, लावणी, कोळी नृत्य, दिंडी नृत्य, भावगीते आणि पाश्चात्य गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, तर परदेशी विद्यार्थ्यांनी खास भारतीय व्यंजन फराळाचा मनमुराद आनंद घेतला. या वेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्र-कुलगुरू डॉ. कुलकर्णी यांनी उपस्थित परदेशी विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध भारतीय परंपरेची ओळख करून दिली. उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भारतीय संस्कृती ही समृद्ध संस्कृती असून, तिला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे.भारतीयांसाठी हा एक महत्त्वाचा उत्सव असून, दिवाळी हा उत्सव रोषणाई, उल्हास, उत्सवाचा प्रेमानी भरलेला मैत्रीपूर्व आणि मानवतेने भरलेला असा सण आहे. अशा उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाण सोबतच या सणाच्या दिव्यतेचा अंदाजही येतो. या कार्यक्रमास इंडियन कौन्सिल आॅफ कल्चरल रिलेशनच्या श्रीमती रेणू, एज्युलॅब एक्सेंज प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ प्रतिक गांधी यांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांच्यासह सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे आणि विद्यार्थी विकास विभागातील कर्मचाºयांनी केले.देहविक्रय करणाºया महिलांच्या मुलांनी घेतले रायफल शूटिंगचे धडेभायखळा पश्चिमकेडील साई संस्था ही गेल्या कित्येक वर्षांपासून देहविक्रय करणाºया महिलांच्या मुलांचे शिक्षण आणि संगोपन करत आहे. दिवाळीमध्ये फक्त फटाके, नवीन कपडे यासारखा गोष्टीमध्ये गुंतून न राहता, या वर्षी दिवाळीचे औचित्य साधून साई संस्थेच्या वतीने देहविक्रय करणाºया स्त्रियांच्या मुलांसाठी रायफल शूटिंगचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रशिक्षक जय हिंद अकादमीचे संचालक निवृत्त जवान महेश नरवडे यांनी मुलांना प्रशिक्षण दिले.आॅलिम्पिकमध्ये रायफल शूटिंगची स्पर्धा कशी होते? त्यांचे नियम काय असतात? याबद्दल माहिती या वेळी मुलांना देण्यात आली. या मुलांना व्यवस्थित ट्रेनिंग मिळाले, तर ही मुले नक्कीच जिल्हा, राज्य, देश किंवा आॅलिम्पिक स्तरावर चांगले प्रदर्शन करू शकतील.त्याचप्रमाणे, सरकारकडून मदत झाल्यास मुलांना घडविण्यास मदत होईल, असेही महेश नरवडे यांनी प्रशिक्षणादरम्यान सांगितले. दरम्यान, साई संस्थेचे संचालक विनय वस्त यांनी सांगितले की, मुलांचा शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकास होणे हे तितकेच गरजेचे असल्यामुळे, आम्ही विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देत असतो.
सोशल मीडियावर दीपावलीचा उत्साह, व्हॉटस् अॅपच्या स्टिकर्सची भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 4:13 AM