दीपिका पादुकोण- रणवीर सिंहचा 5 जानेवारीला साखरपुडा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 09:15 AM2018-01-04T09:15:32+5:302018-01-04T11:10:32+5:30
विराट-अनुष्काच्या लग्नाच्या चर्चा अजूनही सुरू असतानाच बॉलिवूडमधील आणखी एक कपल लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई - विराट-अनुष्काच्या लग्नाच्या चर्चा अजूनही सुरू असतानाच बॉलिवूडमधील आणखी एक कपल लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील राम-लीला म्हणजेच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण लवकरच विवाहसोहळा थाटणार असल्याची तुफान चर्चा सुरू आहे.
दीपिका व रणवीरनं श्रीलंकेमध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केले होतं. न्यू इअर सेलिब्रेशननंतर दीपिकाला आता आपला वाढदिवसदेखील तेथेच साजरा करायचा आहे. 5 जानेवारीला दीपिका पादुकोणचा 32 वा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे दीपिकाच्या वाढदिवशीच तिचा रणवीर सिंहसोहत साखरपुडा होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर व दीपिकानं श्रीलंकेमध्ये वाढदिवसा साजरा करण्याची योजना आखली आहे. रणवीर श्रीलंकेमध्ये एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी गेला होता. तर रणवीरसोबत न्यू इअर साजरा करण्यासाठी दीपिका तेथे पोहोचली होती. यादरम्यान, त्यांच्या साखरपुड्याचीही माहिती समोर येत आहे.
दरम्यान, दीपिका तसंच रणवीर दोघांकडूनही अद्यापपर्यंत साखरपुड्यासंदर्भातील वृत्तांना दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र दीपिकाच्या वाढदिवशीच तिचा रणवीरसोबत साखरपुडा होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
दीपिका-रणवीरनं कधीही आपल्या नातेसंबंधांबाबत उघडपणे चर्चा केलेली नाही, मात्र काही दिवसांपूर्वीच रणवीर बॉयफ्रेंड असल्याचं दीपिकानं कबुल केले होतं. शिवाय, नुकतंच रणवीरनं दीपिकाच्या पालकांचीही भेट घेतली होती. दीपिका व रणवीरनं 'रामलीला', 'बॉम्बे टॉकीज' आणि 'बाजीराव मस्तानी' या सिनेमांमध्ये काम केले आहे. तर पद्मावती या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित सिनेमांमध्येही हे दोघं दिसणार आहेत. मात्र वादविवादांमुळे हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकण्यास विलंब होत आहेत. या सिनेमामध्ये रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे तर दीपिका पादुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे.