वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 02:40 AM2019-05-29T02:40:00+5:302019-05-29T02:40:19+5:30

मुंबई बहुसंख्य मराठी लोकवस्तीमुळे वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे.

Defected Bahujan alliance leads to Congress | वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला फटका

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला फटका

Next

- शेफाली परब- पंडित
मुंबई बहुसंख्य मराठी लोकवस्तीमुळे वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची मते येथे वाढलेली दिसून आली. तर शिवसेनेची केवळ आठ हजार मते वाढली. ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीने तब्बल ११ हजार ५८४ मते येथून मिळवली. याचा मोठा फटका काँग्रेसला बसल्याचे दिसून आले.
वरळी विधान सभेतील बहुसंख्य मतदारांची शिवसेनेवर निष्ठा आहे़ येथील एक गठ्ठा मते युतीच्या उमेदवाराला मिळतात. २०१४ मध्ये मनसेचा प्रभाव असतानाही त्यांना केवळ १८ हजार मतांपर्यंत मजल मारता आली. शिवसेनेने या ठिकाणी ३५ हजारची आघाडी घेतली होती. या वेळेस कोस्टल रोड प्रकल्पामुळे मच्छिमारांची नाराजी, स्थानिक राहिवाशांच्या रोषाचा सामना महापालिकेतील सत्ताधारी पक्ष म्हणजे शिवसेनेला करावा लागला़ बीडीडी चाळीतही याची पुनरार्वृत्ती झाली. मनसेने काँग्रेसला दिलेला पाठिंबा आणि राज ठाकरे यांच्या सभेमुळे येथील मराठी मते काँग्रेसकडे वळण्याचा अंदाज व्यक्त होत होता. शिवसेनेला या मतदारसंघात फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतांची विभागणी होईल, असे अंदाज बांधले जात होते. काँग्रेसच्या मतांमध्ये झालेली सात हजारांची वाढ हेच स्पष्ट करते.
या मतदारसंघात युतीचा पारंपरिक मतदार आहे़ लोकसभा निवडणुकीत त्याची ताकद दिसली़ विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा निश्चितच युतीला होईल़
केंद्रात युतीची सत्ता आल्याने कोळीवाड्यांना अनेक प्रश्नांसाठी आश्वस्त केले जाऊ शकते़
वरळी विधानसभेत २००९ मध्ये राष्ट्रवादीने झटका दिला होता. २०१४ मध्ये मोदी लाटेत शिवसेनेने पुन्हा येथे भगवा फडकविला. आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडी तिसरा पर्याय म्हणून पुढे येऊ शकते.

Web Title: Defected Bahujan alliance leads to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.