Join us  

मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण अतिक्रमणे हटवून?

By admin | Published: April 15, 2015 10:58 PM

येथील नवापूर नाका ते तारापुर एमआयडीसी मधील टाकी नाका दरम्यान साडेसतराशे मीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम फेबु्रवारी २०११ पासून सुरू करण्यात आले

पंकज राऊत ल्ल बोईसर येथील नवापूर नाका ते तारापुर एमआयडीसी मधील टाकी नाका दरम्यान साडेसतराशे मीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम फेबु्रवारी २०११ पासून सुरू करण्यात आले असून दोन टप्यामध्ये बांधण्यात येणाऱ्या या रस्त्याचे टाकीनाका ते हॉटेल ब्ल्यू डायमंड पर्यंत (० ते १५२० मीटर) काम अनंत अडचणींवर मात करून पूर्ण केले मात्र दुसऱ्या टप्प्याच्या हॉटेल ब्ल्यू डायमंड ते नवापुर नाक्याच्या ब्रीजवासी पर्यंत (१५२० ते १७५० मीटर) रस्ता रूंदीकरणाचे काम तेथील रस्त्यालगत असलेल्या दुकाने व घरांच्या अडथळ्यामुळे मागील एक वर्षापासून खोळंबले आहे.सदर रस्ता हा सात अधिक सात असा एकूण चौदा मीटर रूंद व मध्यभागी एक मीटर रूंदीचा दुभाजक (डिव्हायडर) असा बांधण्यात येत असून नियोजनाप्रमाणे रस्ता रूंदीकरण करण्यासाठी या रोड मार्जिनमध्ये येणाऱ्या इमारतीचा काही भाग संबंधितांनी स्वत:हून काढून टाकण्यासंदर्भातचे पत्र एमआयडीसीने जानेवारी २०१४ मध्ये तेथील घरमालकांना दिले त्यापैकी राजाराम विचारे यांनी रस्ता रूंदीकरणासाठी अडथळा ठरणारा त्यांच्या हॉटेल शादावालचा भाग तोडून घेण्याचे पत्र १३ एप्रिल १५ रोजी एमआयडीसीला दिले आहे. मात्र उर्वरीत घरांचा प्रश्न अनुत्तरीत आहे.दरम्यानच्या काळात एमआयडीसीने या संदर्भात पालघरचे तहसिलदारांना पत्र पाठवून अतिक्रमणे काढण्यासंदर्भात संबंधीत ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, एमआयडीसी व मार्जिन स्पेस मध्ये असलेल्या इमारतीच्या मालकांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. त्या नंतर १८ फेब्रुवारी १५ रोजी एमआयडीसी च्या तारापूर विभागाचे उप अभियंता संजय ननावरे यांनी त्यांच्या कार्यालयात बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंचासह काही पक्षाचे पदाधिकारी व पुढारी व काही नागरीकांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी दुसऱ्या टप्प्याच्या २१० मीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण करावे परंतु इमारतीना धक्का लावू नये तसेच उपलब्ध जागेमध्ये चौपदरीकरण करावे या बाबत सहमती ठरविण्यात आली परंतु त्या बैठकीमध्ये बोईसर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नितीन ठाकूर यांनी अतिक्रमण काढूनच चौपदीकरण करण्याची भूमिका मांडली होती. तर सार्वजनिक बांधकाम, खात्याने सदरचा रस्ता या पूर्वीच आपल्या विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलेला असल्याने त्या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे आपल्या मार्फतच काढण्यात यावीत त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची असल्याचे एमआयडीसी ला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. बोईसर ग्रामपंचायतीने एमआयडीसीला २३ जानेवारी २०१४ रोजी पाठविलेल्या पत्रात रस्त्याच्या माध्यमापासून १४ मीटरच्या आत असलेली सर्व बांधकामे तोडण्यात यावीत या बाबत कोठेही दुजाभाव करण्यात येऊ नये असे नमुद केले आहे तर २६ जुन १४ च्या पत्रात अतिक्रमणे फार जुनी असल्याने ती सध्यातरी काढणे अशक्य आहे त्यामुळे उपलब्ध जागेमध्ये आपल्या ड्रॉर्इंग व डिझाईनमध्ये थोडाफार बदल करून रस्ता रूंदीकरणाचे काम त्वरीत पूर्ण करावे अशी विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात बोईसर पोलीस स्थानकातही बैठक घेण्यात आली अनेक चर्चा बैठका नंतरही ठोस मार्ग निघत नाही. अतिक्रमणे हटवू नयेत व हटवावीत अशी दोन वेगवेगळी मतांतरे तर काहींची मते कुठल्याही परिस्थितीत रस्ता पूर्ण झाला पाहिजे या मुख्य व महत्वाच्या रस्त्याचे काम जैसे थे परिस्थितीत राहिल्यास भविष्यात कधी पूर्ण होईल याचीही अनिश्चितता आहे तर रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी काम खोळंबल्यास परत जाण्याचीही शक्यता आहे.४अतिक्रमणे काढणे अशक्य - बोईसर ग्रामपंचायत४तहसीलदार, पोलीस, पीडब्ल्यूडीचे दार एमआयडीसीने ठोठावले४पीडब्ल्यूडी ने झटकले हात ४अतिक्रमणे न हटवता रस्ता मार्गी लावा - काही ग्रामस्थांचा पाठींबा४काही ग्रामस्थ अतिक्रमणे हटविण्यावर ठाम