कोरोनाचे कारण देत आरोपींचा जामिनासाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:06 AM2021-05-15T04:06:34+5:302021-05-15T04:06:34+5:30

पनवेल : कोरोना असल्याने जामीन देण्यात यावा, यासाठी सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी अभय कुरुंदकर व अन्य ...

Defendants apply for bail, giving Corona reasons | कोरोनाचे कारण देत आरोपींचा जामिनासाठी अर्ज

कोरोनाचे कारण देत आरोपींचा जामिनासाठी अर्ज

Next

पनवेल : कोरोना असल्याने जामीन देण्यात यावा, यासाठी सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी अभय कुरुंदकर व अन्य आरोपींनी पनवेल सत्रन्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर येत्या २४ मे रोजी सुनावणी होणार आहे. कोरोनामुळे अनेक कैद्यांना तुरुंगातून पॅरोलवर सोडण्यात आले आहे. यासाठी अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी अभय कुरुंदकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांनी पनवेल सत्रन्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे. अभय कुरुंदकर याच्या पत्नीचे मध्यंतरी निधन झाले. त्यावेळी आपल्याला पॅरोलवर सोडावे, अशी विनंती कुरुंदकर याने केली होती. मात्र न्यायालयानी ती मान्य केली नाही. अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या खटल्यावर कोरोना महामारीचा परिणाम होऊ नये यासाठी या खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाला केली आहे.

Web Title: Defendants apply for bail, giving Corona reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.