एनआयएची वाढीव कोठड़ीची मागणी फेटाळली...
युरेनियम प्रकरणातील आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत
एनआयएची वाढीव कोठडीची मागणी काेर्टाने फेटाळली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने जप्त केलेल्या सुमारे २१ काेटी रुपयांच्या ७ किलो युरेनियम प्रकरणातील आरोपी जिगर पंड्या आणि अबु ताहिर अफसल हुसैन चौधरी यांना सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. एनआयएने चाैकशीसाठी त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली.
राज्य दहशतवादविराेधी पथकाने (एटीएस) दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवत ५ मे रोजी त्यांना अटक केली. पंड्या आणि चौधरी दोघेही उच्चशिक्षित असून त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. दोघेही महाविद्यालयात असल्यापासून एकमेकांना ओळखतात. ८ मे रोजी हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आला. सोमवारी दोघांची कोठडी संपत असल्याने त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय तपासाच्यादृष्टीने चौकशी करण्याबाबत एनआयएच्या पथकाने आणखी दोन दिवसांच्या वाढीव कोठडीची मागणी केली. मात्र आरोपीच्या वकिलांनी त्याला विरोध करत केलेल्या युक्तिवादानंतर ही मागणी फेटाळत, आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली.
............................................