गतविजेत्यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
By admin | Published: November 13, 2014 01:53 AM2014-11-13T01:53:37+5:302014-11-13T01:53:37+5:30
गतविजेत्या इंडियन ऑइल संघाने आपला विजयी धडाका बुधवारीही कायम राखत 49व्या बॉम्बे सुवर्ण चषक हॉकी अजिंक्यपद स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
Next
मुंबई : गतविजेत्या इंडियन ऑइल संघाने आपला विजयी धडाका बुधवारीही कायम राखत 49व्या बॉम्बे सुवर्ण चषक हॉकी अजिंक्यपद स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुंबई हॉकी असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑइलने 5-2 अशा फरकाने आर्मी इलेव्हन संघावर दणदणीत विजय मिळवला आणि अ गटातून उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली.
पहिल्या हाफमध्ये 1-क् अशा आघाडीवर असलेल्या आर्मीला दुस:या हाफमध्ये ऑइलकडून सडेतोड उत्तर मिळाले. ऑइलने मंगळवारी महाराष्ट्र राज्य पोलिसांवर 12-2 असा धमाकेदार विजय मिळवल्यानंतर याही लढतीत त्यांच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा होती. मात्र आर्मीकडून त्यांना कडवी झुंज मिळाली. दुस:या हाफमध्ये पेनल्टी स्पेशालिस्ट गुरजिंदर सिंह याने दोन गोल केले, तर प्रभजोत सिंह, रोशन मिंझ आणि धरमवीर सिंह यांनी प्रत्येकी एक गोल करून विजयात मोलाची भूमिका बजावली. आर्मीकडून बचतार सिंह आणि सिरजू यांना गोल करण्यात यश आले. आर्मीचा गोलकीपर पी़ टी़ राव याने जवळपास अर्धा डजन गोल अडविल्याने त्यांचा दारुण पराभव टळला.
त्याआधी झालेल्या लढतीत भारतीय नौदलाने क्-2 अशा पिछाडीवरून मुसंडी मारत क गटात ओएनजीसी संघाला 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. ओएनजीसीच्या गगन आणि मनदीप सिंह यांनी गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली.
मात्र नौदलाने जबरदस्त कमबॅक केले. 53व्या मिनिटाला प्रतीक सिंह आणि 66व्या मिनिटाला फहीम खान यांनी गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत रोखण्यात यश मिळवले. या बरोबरीमुळे ओएनजीसीला उपांत्य फेरीत स्थान पक्के करण्यासाठी
पश्चिम रेल्वेवर दोन गोलच्या फरकाने विजय मिळवणो आवश्यक आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
क गट - ओएनजीसी 2 (गगन 14 मि., मनदीप सिंह 47 मि.) बरोबरी वि. भारतीय नौदल 2 (प्रतीक सिंह 53 मि., मोह. फहीम खान 66 मि.)
अ गट- इंडियन ऑइल 5 (गुरजिंदर सिंह 42 मि., 68 मि., प्रभजोत सिंह 49 मि., रोशन मिंझ 66 मि., धरमवीर सिंह 7क् मि. ) विजयी वि. आर्मी इलेव्हन 2 (बचतर सिंह 25 मि., सिरजू 69 मि.)
ब गट - भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड 2 (तुषार खांडेकर 19 मि., एस़ व्ही़ सुनील 38 मि.) विजयी वि. पंजाब नॅशनल बँक क्