स्वर्णिम विजय वर्षानिमित्त संरक्षण दलांचे मिनी मॅरेथाॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:07 AM2021-08-23T04:07:02+5:302021-08-23T04:07:02+5:30
मुंबई : पाकिस्तानवर १९७१ च्या युद्धातील विजयाचे ५० वे वर्ष साजरे केले जात आहे. भारतीय संरक्षण दलांच्या पराक्रमाची गाथा ...
मुंबई : पाकिस्तानवर १९७१ च्या युद्धातील विजयाचे ५० वे वर्ष साजरे केले जात आहे. भारतीय संरक्षण दलांच्या पराक्रमाची गाथा लोकांपर्यंत पोहचावी यासाठी स्वर्णिम विजय वर्ष साजरा करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून रविवारी मुंबईत ''रन फाॅर फन'' या दहा किलोमीटरच्या मिनी मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले होते. यात संरक्षण दलातील जवान, त्यांचे कुटुंबीयांसह एमसीसीचे विद्यार्थी अशा चारशेहून अधिक लोकांनी मिनी मॅरेथाॅनमध्ये सहभाग नोंदविला.
भारतीय सशस्त्र दलांकडून वर्षभर चालणाऱ्या समारंभाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ''रन फॉर फन''चे आयोजन करण्यात आले होते.
कुलाबा मिलिटरी स्टेशन येथे मॅरेथॉनला झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमासाठी लेफ्टनंट जनरल एस.के. प्रशार यांच्यासह विविध अधिकारीही उपस्थित होते. १९७१ च्या पाकिस्तानवरील विजयाला ५० वर्षे झाली. त्यामुळे येत्या वर्षभर ''स्वर्णिम विजय वर्ष'' साजरे केला जाणार आहे. शिवाय, राजधानी दिल्लीत विजयी मशाल प्रज्वलित करण्यात आली असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही मशाल मुंबईत पोहचणार आहे.