Join us

‘राज्याचे स्वतंत्र धोरण निश्चित करावे’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 5:51 AM

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी, तसेच यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी राज्याचे स्वतंत्र धोरण निश्चित करावे, त्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना केली जावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.

मुंबई : मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी, तसेच यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी राज्याचे स्वतंत्र धोरण निश्चित करावे, त्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना केली जावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १४वी बैठक बुधवारी झाली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आमदार, संबंधित विभागांचे अधिकारी, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक व्याघ्र प्रकल्पात वाघांचा मागोवा ठेवण्याकरिता व पुढील मानव आणि वन्यजीव संघर्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशिक्षित हत्तींची गरज आहे, तशी स्वतंत्र पथके तैनात करावी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर अभयारण्यातून जे प्रकल्प जाणार आहेत त्यात वन्यजीवांची मार्गिका जपण्यासाठी संबंधित यंत्रणांसोबत बैठक घ्यावी, उपाययोजना निश्चित करून, अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.